मुंबईत लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ लागलीय.१५ ऑगस्टपासून कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलीय..त्यामुळे ज्यांचा लसीचा दुसरा डोस बाकी आहे, अशा नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागलीय....पहिला डोस घेतल्यानंतर आवश्यक कालावधी उलटूनही अनेकांनी दुसरा डोस अजून घेतलेला नाही... तर काहींनी दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र दोन्ही डोस घेतल्याशिवाय रेल्वे प्रवास शक्य नसल्याने अशा लाभार्थींनी दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव सुरू केलीय.
#vaccination #covidvaccination #vaccinationinmumbai #vaccinationbeginsinmumbai #mumbailocal #localtrains